परिवहन आणि बंदरे







अधिनियम व नियम |
---|
1.मोटार वाहन अधिनियम, 1988 |
2.केंद्रीय मोटार वाहन नियम, 1989 |
3.महाराष्ट्र मोटार वाहन नियम, 1989 |
4.महाराष्ट्र मोटार वाहन कर अधिनियम, 1958 आणि नियम, 1959 |
5.महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन अधिनियम, 1950 आणि नियम, 1952 |
6.महाराष्ट्र मोटार वाहन (प्रवासी कर) अधिनियम, 1958 आणि नियम, 1959 |
7.रस्त्याद्वारे वहन अधिनियम, 2007 आणि नियम, 2011 |
8.मर्चंटस शिपिंग ॲक्ट, 1985 (सर्वसाधारण बाबी). |
9.इंडीयन पोर्टस ॲक्ट, 1985 (सर्वसाधारण बाबी). |
10.कास्टींग व्हेसलस ॲक्ट (सर्वसाधारण बाबी). |
11.महाराष्ट्र सागरी मंडळ अधिनियम, 1996 |
रस्ता सुरक्षा
रस्ता सुरक्षा उपकर –
महाराष्ट्र मोटार वाहन कर अधिनियम १९५८ मध्ये कलम ३ (१अ) व कलम ११ (६) व मोटार वाहन अधिनियम १९८८ च्या कलम २०१५ (४) मधील तरतुदीनुसार सुधारणा करुन मोटार वाहन करावरील उपकरण लावून त्यामधून येणाऱ्या निधीमधून रस्ता सुरक्षा निधी स्थापना करण्याबाबत शासन निर्णय क्र. एमव्हीआर ०७१६/प्र.क्र. ३२४/परि-२, दि. ०१.०९.२०१६ नुसार मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार, राज्यातील नवीन नोंदणी होणाऱ्या व राज्यात कायमस्वरुपी स्थलांतरीत झालेल्या वाहनांवर देय कराच्या विहीत टक्केवारीनुसार रस्ता सुरक्षा उपकर वसुल केला जातो. सदर टक्केवारी वाहन प्रकारनिहाय ०.५% ते १०% उपकर आकारला जातो.
महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा परिषद–
मा. मंत्री (परिवहन) यांचे अध्यक्षतेखाली दिनांक 13.05.2015 रोजीच्या अधिसूचनेनूसार राज्य रस्ता सुरक्षा परिषदेची स्थापना करण्यात आली आहे.
रस्ता सुरक्षा निधी नियंत्रण समिती–
रस्ता सुरक्षा निधी मधून करावयाच्या खर्चाच्या अनुषंगाने मान्यता देण्याबाबत, उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने मा. मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली रस्ता सुरक्षा निधी नियंत्रण समितीची स्थापना दिनांक 01.09.2016 रोजीच्या शासन निर्णयान्वये करण्यात आली आहे.
जिल्हा रस्ता सुरक्षा समिती –
रस्त्यावरील अपघात कमी करण्यासाठी व रस्ता सुरक्षा विषयक विविध उपाययोजना राबविण्यासाठी, मोटार वाहन कायदा, 1988 च्या कलम 215 अन्वये दिनांक 13.05.2015 रोजीच्या अधिसूचनेनुसार जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा रस्ता सुरक्षा समिती स्थापन करण्यात आली असून दिनांक 05.12.2022 रोजी सदर समित्या पुनर्गठीत करण्यात आलेल्या आहेत.
रस्ता सुरक्षा कक्ष–
मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानूसार दिनांक 29.12.2018 रोजी रस्ता सुरक्षाविषयक राज्यस्तरीय कामकाज हाताळण्यासाठी रस्ता सुरक्षा कक्ष हा परिवहन आयुक्त यांच्या कार्यालयाने स्थापन करण्यात आला आहे.
रस्ता अपघात सांख्यिकी माहिती :- सन 2022, 2023 व 2024 मधील राज्यातील अपघात व अपघाती मृत्यूंची आकडेवारी खालीलप्रमाणे आहे –
अ.क्र | वर्ष | एकूण अपघात | एकूण मृत |
---|---|---|---|
1 | 2022 | 14058 | 15224 |
2 | 2023 | 14119 | 15366 |
3 | 2024 (Provisional) | 14267 | 15335 |
– | 2023 ते 2024 तुलनात्मक वाढ / घट (+) (-) | 1% | -0.2% |
सागरमाला प्रकल्प
महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर प्रवासी जलवाहतुकीसाठी जेट्टी व तद्नुषंगिक प्रवासी सुविधा पुरविण्यासाठी केंद्र शासनाच्या सागरमाला योजनेंतर्गत केंद्र शासनाकडून प्रकल्प खर्चाच्या 50% इतके अर्थसहाय्य प्राप्त होते. मागील पाच वर्षात सागरमाला योजनेतंर्गत केंद्र शासनाकडून दिनांक 31.03.2025 पर्यंत रु. 317.52 कोटी इतका निधी प्राप्त झाला आहे.
अ.क्र | तपशील | प्रकल्पांची संख्या | प्रकल्पाची किंमत | केंद्र प्राप्त निधी | राज्य प्राप्त निधी | एकूण खर्च |
---|---|---|---|---|---|---|
1 | पूर्ण झालेली कामे | 13 | 380.45 | 190.22 | 195.46 | 385.69 |
2 | प्रगतीपथावरील कामे | 14 | 784.21 | 130.76 | 268.59 | 289.44(हा खर्च दि. 31.03.2025 पर्यंतचा आहे) |
3 | प्रस्तावित कामे | 7 | 622.68 | – | – | – |
अ.क्र. | कार्यासन | जनमाहिती अधिकारी यांचा तपशील | प्रथम अपिलीय अधिकारी यांचा तपशील |
---|---|---|---|
1 | परिवहन-1 | जनमाहिती अधिकारी तथा कक्ष अधिकारी | प्रथम अपिलीय अधिकारी तथा सह सचिव |
2 | परिवहन – 2 | जनमाहिती अधिकारी तथा कक्ष अधिकारी | प्रथम अपिलीय अधिकारी तथा सह सचिव |
3 | परिवहन – 2 | जनमाहिती अधिकारी तथा कक्ष अधिकारी | प्रथम अपिलीय अधिकारी तथा सह सचिव |
4 | परिवहन – 2 | जनमाहिती अधिकारी तथा कक्ष अधिकारी | प्रथम अपिलीय अधिकारी तथा सह सचिव |
5 | परिवहन – 2 | जनमाहिती अधिकारी तथा कक्ष अधिकारी | प्रथम अपिलीय अधिकारी तथा सह सचिव |
कार्यालयाचा पत्ता :- | गृह (परिवहन) विभाग, 2 रा मजला, मुख्य इमारत, मंत्रालय, मुंबई 400 032. |
अ.क्र. | कार्यासन | जनमाहिती अधिकारी यांचा तपशील | प्रथम अपिलीय अधिकारी यांचा तपशील |
---|---|---|---|
1 | बंदरे – 1 | जनमाहिती अधिकारी तथा कक्ष अधिकारी | प्रथम अपिलीय अधिकारी तथा सह सचिव |
2 | बंदरे- 2 | जनमाहिती अधिकारी तथा अवर सचिव/कक्ष अधिकारी | प्रथम अपिलीय अधिकारी तथा सह सचिव |
कार्यालयाचा पत्ता :- | गृह (बंदरे) विभाग, 2 रा मजला, मुख्य इमारत, मंत्रालय, मुंबई 400 032 |