बंद

    महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळ मर्यादित, वरळी, मुंबई

    एमएसपीएचसीने पूर्ण केलेले प्रकल्प_पृष्ठ-0001
    • तारीख : 13/03/1974 -

    शासन निर्णय, गृह विभाग, क्रमांक- सीआरपी ०१७४/रोमन पंधरा, दिनांक १४/०२/१९७४ अन्वये महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळ मर्यादित, वरळी, मुंबई या महामंडळाच्या स्थापनेस शासन मंजूरी प्राप्त होऊन दिनांक १३.०३.१९७४ रोजी त्याची स्थापना करण्यात आली आहे. तसेच, कंपनी कायदा १९५६ अंतर्गत नोंदणी क्रमांक १७२८१/१९७३-७४ द्वारे या महामंडळाची नोंदणी करण्यात आली आहे. या महामंडळाचे अधिकृत भागभांडवल रु.१०.०० कोटी इतके असून अदा केलेले भागभांडवल रु. ७.९६ कोटी इतके आहे.

    महामंडळाचे मुख्य उद्दिष्ट गृह विभागाच्या अधिपत्याखालील पोलीस विभाग, कारागृह विभागासाठी प्रशासकीय इमारती / निवासस्थाने बांधणे आणि गृहविभागाच्या घटक आणि संलग्न कार्यालयांसाठी कल्याणकारी योजना तयार करणे व त्या अंमलात आणणे असे आहे. त्याचबरोबर गृह विभागाच्या अधिपत्याखालील अन्य विभागांसाठी सुध्दा बांधकाम प्रकल्पांची कामे करण्यात येतात. महामंडळाच्या सन १९७४ या वर्षाच्या स्थापनेपासून आतापर्यंत एकूण ३८,१७९ निवासस्थाने पोलीस विभागाला हस्तांतरित केली आहेत.

    उद्दीष्टेः

    • महाराष्ट्र राज्यातील गृह विभागाच्या अधिपत्याखालील पोलीस विभाग, कारागृह विभाग तसेच, गृहरक्षक दल व नागरी संरक्षण विभाग यांच्या मागणीनुसार व आवश्यकतेनुसार सर्व सोयी-सुविधांसह अत्याधुनिक इमारतींचा व त्या सभोवतालच्या परिसराचा परिपूर्ण आराखडा तयार करुन बांधकाम करणे.

    • प्रत्येक विभागाच्या बांधकामाच्या गरजा विचारात घेऊन अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन व सर्वोच्च गुणवत्तेसह आवश्यकते नवीन बांधकाम प्रकल्प विहित कालावधीत पूर्ण करणे व त्याचे संबंधित विभागास हस्तांतर करणे,

    • बांधकाम व्यवसायातील नवनवीन तंत्र व तंत्रज्ञान संबंधित विभागाच्या बदललेल्या गरजा, नव्याने उपलब्ध झालेली साधन सामुग्री या सर्वाचा वापर करुन संपूर्ण पारदर्शकतेसह प्रकल्प बांधकाम करणे.

    ध्येयः

    • या महामंडळाकडून प्रशासकीय इमारती तसेच, निवासी बांधकामे मुख्यतः कायद्रयाचे रक्षक असणारे पोलीस अधिकारी/कर्मचारी यांच्यासाठी तयार करण्यात येतात. त्यामुळे, पोलीसांची कर्तव्ये, जबाबदा-या, जनतेप्रती असलेली संवेदनशिलता, त्यांच्यावर असलेले ताणतणाव इ. सर्व बाबींचा विचार करुन पोलीस विभागाच्या वेगवेगळया प्रशासकीय इमारतींचे बांधकाम करताना अत्याधुनिक सुविधांसह तेथील अधिकरी/कर्मचा-यांची वेगवेगळी कर्तव्ये विचारात घेऊन प्रशासकीय इमारती, पोलीस ठाणी व पोलीस विभागाच्या अन्य इमारती तसेच निवासी बांधकाम प्रकल्प पूर्ण करणे हे ध्येय साध्य करता येते.

    • महामंडळाच्या प्रकल्पांची संक्षिप्त माहिती (१ एप्रिल २०१७ ते आजपर्यंत)

    • महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळामार्फत राज्यात निवासी व अनिवासी असे अनेक प्रकल्प हाती घेण्यात आले असून, हे प्रकल्प विविध टप्प्यांवर कार्यान्वित आहेत, काही हस्तांतरित झालेले आहेत, काही प्रगतीपथावर आहेत आणि काहींसाठी निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. खाली त्याचे तपशीलवार वर्णन करण्यात आले आहे:

      1. हस्तांतरित प्रकल्प : महामंडळाकडून एकूण १२२ प्रकल्प हत्सांतरित झाले असून त्यामध्ये ६३ निवासी व १४९ अनिवासी प्रकल्पांचे यशस्वीरित्या हस्तांतरण करण्यात आले आहे. या प्रकल्पांमध्ये एकूण ७७८९ निवासस्थानांचा समावेश आहे. या प्रकल्पांचे बांधकाम पूर्ण झाले असून संबंधित उपभोक्ता विभागास हस्तांतरित करण्यात आले आहे. ही संख्या महामंडळाच्या कार्यक्षमतेचा आणि नियोजनबद्धतेचा उत्तम नमुना दर्शवते.
      2. प्रगतीपथावर असलेले प्रकल्प : सध्या महामंडमार्फत एकुण १०१ प्रकल्प प्रगतीपथावर असून त्यामध्ये ५९ निवासी व १३२ अनिवासी प्रकल्प विविध टप्प्यांवर प्रगतीपथावर आहेत. या प्रकल्पांमध्ये एकूण १०,३८५ निवासस्थानांचा समावेश असून, यासाठी ७,६९९.८५ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे. हे प्रकल्प लवकरच पूर्णत्वास येऊन उपभोक्ता विभागास हस्तांतरित करण्यात येतील.
      3. निविदा प्रसिद्ध झालेले प्रकल्प : महामंडळाकडून एकुण १० प्रकल्पांची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये ४ निवासी व ११ अनिवासी प्रकल्पांचा समावेश असून, १८३ निवासस्थाने प्रस्तावित करण्यात आली आहेत. या प्रकल्पांसाठी २४८.६७ कोटी रुपये प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. सदर प्रकल्प लवकरच कार्यान्वयनाच्या टप्प्यात प्रवेश करतील आणि निविदा प्रक्रियेनंतर प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात हाईल.
    महालमंडळातील प्रकल्पांचा तपशील
    अनु. क्र. तपशील प्रकल्पांची संख्या निवासी प्रकल्प अनिवासी प्रकल्प प्रकल्पातील निवासीस्थानांची संख्या प्रशासकीय मान्यता रक्कम (रु. कोटी)
    १. दिनांक १ एप्रिल २०१७ ते आज पर्यंत हस्तांतरीत झालेले निवासी व अनिवासी प्रकल्प (महालमंडळाकडून) १२२ ६३ ५९ ७३७५ ३३१२.६२
    २. प्रगतीपथावर असलेले निवासी व अनिवासी प्रकल्प १०७ ५९ ४८ १०३५५ ६६६९.५८
    ३. निविदा प्रसिद्ध झालेले निवासी व अनिवासी प्रकल्प १० ९१३ २४६.५७

    लाभार्थी:

    वरती नमूद केल्याप्रमाणे

    फायदे:

    वरती नमूद केल्याप्रमाणे

    अर्ज कसा करावा

    संबंधीत विभागाशी संपर्क साधा.